Uddhav Thackeray | ‘वर्षा’ बद्दल मला आदर पण मातोश्रीत आल्यावर माझी शक्ती मला परत मिळाली’
मी एका क्षणात वर्षा सोडलं आणि मातोश्रीला गेलो. मला वर्षाबाबत आदर आहे, पण मातोश्रीत आल्यानंतर माझी शिवसैनिकांची शक्ती मला परत मिळाली. या शक्तीला त्रिवार वंदन करतो.
मी एका क्षणात वर्षा सोडलं आणि मातोश्रीला गेलो. मला वर्षाबाबत आदर आहे, पण मातोश्रीत आल्यानंतर माझी शिवसैनिकांची शक्ती मला परत मिळाली. या शक्तीला त्रिवार वंदन करतो. हे प्रेम आशीर्वाद तोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करायचं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना इशारा दिलाय. त्याचबरोबर फक्त शिवसेना फोडण्याची त्यांची चाल नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा भगवा फोडण्याची त्यांची चाल आहे. आजपर्यंत अनेकजण आपल्याला विचार होते की तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय. तर त्यांना सांगायचं की शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलाय.
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम

