Uddhav Thackeray : फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळणार कारण… ठाकरेंकडून CM चं तोंडभरून कौतुक
'महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत.', उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस राज्यभरात साजरा केला जात आहे. राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं तोंडभरून कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला असून त्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधाळल्याचे पाहायला मिळाले. ‘फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू, आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे.’, असं ठाकरेंनी या लेखात म्हटलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

