Shivsena UBT : ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कन्फ्यूजन… मविआ विरोधात घोषणाबाजी, लक्षात येताच मारला डोक्यावर हात अन्…
रत्नागिरीतील उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट "महाविकास आघाडीचं करायचं काय?" असा प्रश्न विचारत, आघाडीविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
रत्नागिरी येथील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचं करायचं काय? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून मविआविरोधातच ओरड पाहायला मिळाली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही दाखवला आणि ठाकरेंच्या आंदोलनाची खिल्लीच उडवली. तर ठाकरेंच्या आंदोलनावर माझी हीच प्रतिक्रिया असल्याचे मंत्री उदय सामंत टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले. देशातील आणि राज्यातील ठाकरे गटाचं आंदोलन हे महाविकास आघाडीविरोधातच असल्याचे उदय सामंत म्हणाले. दरम्यान, रत्नागिरीच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाच्या घोषणाबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

