Uddhav Thackeray : विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला; उद्धव ठाकरेंकहा घणाघात
Azad Maidan Protest : आझाद मैदानात बोलताना उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण हिंदीची सक्ती माथी मारु देणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जीआरची होळी केली. हे विधेयक आणून तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला, तर विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. आझाद मैदान येथील सभेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारला असं वाटतं की, जो कोणी सरकार, भाजप विरोधी बोलेल तो देशद्रोही. यांना कल्पना नाही, स्वातंत्र्य लढयात यांचा काही संबंध नव्हता. आता दुर्देवाने म्हणा, कशा पद्धतीने निवडून आले हे त्यांना सुद्धा माहिती नाहीय. लोकसभेला 400 पार करायला निघाले होते. पण महाराष्ट्रात उधळलेलं गाढव आपण रोखलं. एकजुटीचा विजय झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

