Udhav Thackeray : शिवसेनेच्या बैठकीत ठाकरेंचा शिंदे आणि भाजपवर निशाणा
Shivsena UBT Meeting : शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंनी शिंदेसेना आणि भाजपवर टीका केली आहे.
शिवसेना भवनात झालेल्या बैठकीदरम्यान, ठाकरेंची शिंदे आणि भाजपवर टीका बघायला मिळाली आहे. चिंधीचोर मिंधे भाजपसोबत गेला, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे. मिंधे स्वत:ला मोदींचा घरगडी म्हणतो, असाही घणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.
घरगड्याची शेती बघा, शेतीत हेलिकॉप्टर, संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे. भाजप आणि मिंधे मुंबई आदानींच्या खिशात घालू पाहात आहेत असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर जगातल्या मोठ्या पक्षाचा बीएमसीमध्ये जीव अडकला आहे, अशीही टीका ठाकरेंनी केली आहे. शिवसेना भवनात काल सर्व शाखा प्रमुखांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. या बैठकीत रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित

