Uddhav Thackeray | जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र नेमकं कुणावर?

Uddhav Thackeray | जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र नेमकं कुणावर?

| Updated on: Apr 21, 2026 | 1:58 PM

शिवसेना उबाठाचे प्रमुख ठाकरे यांनी आज (२१ एप्रिल २०२६) रोजी भारतीय कामगार सेनेच्या ५८ व्या वार्षिक सभेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी ‘ठाकरे ब्रँड’बाबत मोठं विधान केलं.

शिवसेना उबाठाचे प्रमुख ठाकरे यांनी आज (२१ एप्रिल २०२६) रोजी भारतीय कामगार सेनेच्या ५८ व्या वार्षिक सभेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी ‘ठाकरे ब्रँड’बाबत मोठं विधान करत, त्याची खरी सुरुवात अजून व्हायची असल्याचं सांगितलं. एकदा सुरुवात झाली की त्याचा प्रभाव सर्वांना दिसेल, असा इशाराच त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

ठाकरे म्हणाले की, ‘ठाकरे ब्रँड’ म्हणजे राज्यातील मराठी हिंदू समाजाच्या हक्कांसाठी उभं राहणं होय. त्यांनी कामगार संघटनांवर होत असलेल्या दबावाचाही उल्लेख केला. मजबूत युनियन मोडून त्यांना मालकांच्या बाजूला वळवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

यादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकारणावर टीका करत त्याची तुलना IPL या शब्दाशी केली ‘इंडियन पोलिटीकल लिग’ अशी केली. जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर लगावला.

Published on: Apr 21, 2026 1:58 PM
Follow Us