सत्तांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंचा ‘इथे’ जाहीर मेळावा, बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना रणशिंग फुंकणार
ज्या परिसरात हा मेळावा होतोय, तेथील माजी नगरसेवकांनी मेळाव्यासाठी खास प्रकारचे टीशर्ट तयार केले आहेत. उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत... असं यावर लिहिलंय.
मुंबईः शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज प्रथमच गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) या मेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईतल्या गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातील सत्तांतरानंतर गटप्रमुखांना एकत्रितपणे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे संबोधणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यंदा शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाहीये. त्यामुळेही आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, ज्या परिसरात हा मेळावा होतोय, तेथील माजी नगरसेवकांनी मेळाव्यासाठी खास प्रकारचे टीशर्ट तयार केले आहेत. उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत… असं यावर लिहिलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

