Udhav Thackeray : राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
उद्धव ठाकरे आज कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ठाकरे बंधु परतल्यानंतरच ठाकरेंच्या युतीचा सस्पेन्स संपणार आहे.
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासोबत परदेशी रवाना झाले आहेत. 4 मे रोजी ठाकरे मुंबईत परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा सध्या कुटुंबासह परदेश वारीवर आहेत. ते 29 एप्रिलला मुंबईत परतणार आहेत. एकीकडे राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे ठाकरे बंधु हे परदेशवारीसाठी गेल्याने या प्रदेश दौऱ्याचं कारण काय अशा चर्चा आता रंगायला लागल्या आहेत. आता जोवर ठाकरे बंधु पुन्हा मुंबईत परतत नाही तोवर या युतीचा सस्पेन्स मात्र कायम राहणार आहे.
Published on: Apr 22, 2025 09:54 AM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

