पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील अनोखं बॅनर, होतेय तुफान चर्चा; नेमकं काय म्हटलंय?
पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एक अनोखं बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. 'निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही, मी पक्षाशी आणि पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि ५ वर्ष मतदारांशी प्रामाणिक राहीन', असा आशय या बॅनरवर लिहिलाय
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एक अनोखं बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. ‘निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही, मी पक्षाशी आणि पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि ५ वर्ष मतदारांशी प्रामाणिक राहीन’, असा आशय या बॅनरवर लिहिला आहे. तर त्यावर आणखी असेही नमूद केले आहे की, जर निवडून आल्यावर मी त्याच पक्षात राहिलो नाही तर मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तीला निवडून देवू नका… आवाहन जागृत पुणेकरांचे अशा शीर्षकाखाली असे म्हटले की, ‘उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी आपल्या परिचय पत्रकामध्ये एकच उल्लेख करावा… असेही म्हटले आहे.’ सध्या या बॅनरवरच्या आशयाने पुणे शहरात एकच चर्चा होत आहे. जे उमेदवार आपल्या परिचय पत्रकात हे लिहतील त्यांनाच मतदान करा, असं आवाहनही करण्यात आलंय.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

