AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSRTC : धक्कादायक... तो आला त्यानं कोयता काढला अन्.. 'लालपरी'त नेमकं काय घडलं? प्रवाशांमध्ये खळबळ

MSRTC : धक्कादायक… तो आला त्यानं कोयता काढला अन्.. ‘लालपरी’त नेमकं काय घडलं? प्रवाशांमध्ये खळबळ

| Updated on: Aug 01, 2025 | 12:57 PM
Share

१ ऑगस्ट २०२५ रोजी बारामतीहून इंदापूरकडे जाणाऱ्या एका एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लालपरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. एसटीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून कोयत्याने वार करण्यात आलाय. यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झालाय. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ज्या बसमध्ये ही घटना घडली ती बस बारामतीवरून इंदापूरच्या दिशेने जात होती. या घटनेत हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, लालपरीमध्ये अज्ञात व्यक्तीने कोयत्याने वार केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास बारामतीहून इंदापूरकडे जाणाऱ्या एका एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला केला. बस बारामती तालुक्यातील काटेवाडी गावाजवळ असताना हा प्रकार घडला. बसच्या मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने अचानक शेजारी बसलेल्या दुसऱ्या प्रवाशावर कोयत्याने हा हल्ला केला. तर हल्ल्यात जखमी झालेला तरुण बसमधून खाली उतरून पळून गेला. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Aug 01, 2025 12:57 PM