Brijbhushan Singh : ‘माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशात पाऊल ठेवू देणार नाही’ – बृजभूषण सिंह

श्रीरामाचं दर्शन करायला यायचं असेल तर माफी मागा, असं मी बोललो. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे पाय ठेवू देणार नाही. उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागू शकत नसाल तर मग साधू संतांची माफी मागा, मोदींची माफी मागा.

प्राजक्ता ढेकळे

|

May 22, 2022 | 5:31 PM

नवी दिल्ली-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे बृजभूषण सिंह राज यांच्या सभेनंतरही आपल्या मतावर ठाम आहेत. ही राज ठाकरे यांची धार्मिक यात्रा नाही, तर राजकीय यात्रा आहे. श्रीरामाचं दर्शन करायला यायचं असेल तर माफी मागा, असं मी बोललो. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे पाय ठेवू देणार नाही. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जनतेची माफी मागू शकत नसाल तर मग साधू संतांची माफी मागा, मोदींची माफी मागा, असंही मी बोललो. त्यानंतर योगींची माफी मागण्यासही सांगितलं. ते आज मुख्यमंत्री आहेत, पण ते महंत आहेत. अयोध्या आंदोलनात ते सहभागी होते, असं बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) म्हणाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें