रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्याला पावसाने झोडपल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला आहे. सकाळ आणि दुपारच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. लांजा तालुक्यातील आरगाव, व्हेळ रिंगणे ,कुरंग वीलवडे आदी भागांमध्ये पावसाची हजेरी झाली. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. या वेळी फळ कमी असतानाच आता अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे आंब्यांचे मोठे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला आंब्याचा घास शेतकऱ्यांकडून हिरावला गेला आहे. आंब्याचा मोहोर यंदा कमी असल्याने फळांची संख्या कमी होती. आता सलग दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने झाडावरुन फळे जमिनीवर पडली आहेत. अवकाळी पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आंब्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
Published on: Mar 28, 2026 10:18 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

