भाजपच्या प्रमुख नेत्यांचे UP CM Yogi Aadityanath यांनी मानले आभार
साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सत्तेवर येतायत. त्यामुळे भाजपमधील (BJP) त्यांचा मानमरातब आणि रुतबा आपसुकच वाढलाय
साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सत्तेवर येतायत. त्यामुळे भाजपमधील (BJP) त्यांचा मानमरातब आणि रुतबा आपसुकच वाढलाय. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) नंतर ते सर्वात शक्तीशाली नेते म्हणूनही ओळखले जातील. त्याची कारणे अनेक आहेत. एक तर देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधून जातो. येथे लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळेच तर साऱ्याच पक्षांनी उत्तर प्रदेशासाठी आकाशपाताळ एक केले. मात्र, येथे जादू चालली ती फक्त योगी आणि मोदी यांची. मोदी यांच्या प्रतिमेचे जितके श्रेय या विजयासाठी घेतले जाईल. तितकेच श्रेय योगींनाही द्यावे लागेल. त्यामुळे ते भाजपमध्ये एक शक्तीशाली नेते म्हणून उदयास आले आहेत. ते कसे हेच जाणून घेऊ.
Published on: Mar 10, 2022 7:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
