AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Explainer: कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी, 2024 ला पुन्हा देशाची गादी?

UP Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: पुन्हा एकदा यूपी, उत्तराखंडपासून ते गोवा, मणिपूरपर्यंत थेट मोदी आणि मोदीच दिसतायत. त्यामुळे 2024 च्या लोकसभेची देशाची गादी पुन्हा एकदा मोदींकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

tv9 Explainer: कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी, 2024 ला पुन्हा देशाची गादी?
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2022 | 8:57 PM
Share

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार पाचपैकी तब्बल चार राज्यांमध्ये भाजपचे (BJP) सरकार येण्याची शक्यता आहे. विशेषतः देशभरात गाजलेले उत्तर प्रदेशातील कोरोना (Corona) मृत्यू, गंगेच सोडून दिलेले मृतदेह यावरून जोरदार राजकारण झाले. मात्र, तरीही उत्तर प्रदेशमध्येही पुन्हा एकदा योगी (Yogi) सरकार येताना दिसत आहेत. एकीकडे मोदी लाट ओसरली, याची चर्चा सुरू होती. मात्र, पुन्हा एकदा यूपी, उत्तराखंडपासून ते गोवा, मणिपूरपर्यंत थेट मोदी आणि मोदीच (Modi) दिसतायत. त्यामुळे 2024 च्या लोकसभेची देशाची गादी पुन्हा एकदा मोदींकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हा भाजपसाठी मोठा दिलासा असून, मोदींच्या या करिष्माच्या आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला फायदा होणार हे नक्की.

उत्तर प्रदेशमध्ये कमळ फुलले

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. या ठिकाणी आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार 273 जागा भाजपच्या खात्यात जाणार आहेत. यावरून येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असताना दिसते आहे. समाजवादी पक्षाच्या वाट्याला 119 जागा जातायत. तर बहुजन समाज पक्षाला फक्त 5 आणि काँग्रेस आणि इतरांना प्रत्येकी 3 जागा मिळतायत. लोकसभेच्या गादीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. कारण उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास 80 जागा आहेत. येथे मोदींची जादू चालणे लोकसभेसाठी लाभदायक ठरणार आहे. उत्तराखंडमध्येही 70 पैकी 42 जागा भाजपच्या खात्यात जाण्याचा अंदाज आहे. येथेही भाजप सरकार सत्तेत येऊ शकते. त्याचाही लोकसभेसाठी फायदा होणार आहे. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या 5 जागा आहेत.

गोवा, मणिपूरमध्येही बाजी

गोवा आणि मणिपूरनेही भाजपला तारल्याचे चित्र आहे. गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. येतथे सध्या 19 ठिकाणी भाजप येताना दिसत आहे. काँग्रेस 11, आप 2, मगोप आघाडीला 3 आणि इतरांना पाच जागा मिळतायत. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. मणिपूरमध्येही विधानसभेच्या 60 जागांपैकी 24 जागांवर भाजप येण्याची शक्यता आहे. तर 11 जागी काँग्रेस, एनपीपी 12 आणि इतर 13 जागांवर येण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्येही लोकसभेच्या 2 जागा आहेत. याचाही भाजपला फायदा होणार आहे. एकंदर काय तर महत्त्वाचे असे उत्तर प्रदेश भाजपने राखले आहे. देशातील सत्तेचा मार्ग तिथूनच जातो. त्यामुळे मोदींची चिंता तूर्तास तरी दूर झालीय.

इतर बातम्याः 

Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने गाठली मॅजिक फिगर, सपाची शतकी खेळी

Election Result 2022 Live: निकालाआधीच अखिलेश यांचे फटाके; म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…

Assembly Election Results 2022 Date : 10 मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल, निकाल कुठे? कसा बघाल? वाचा एका क्लिकवर

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.