Supriya Sule | बारामतीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सुळेंचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहे.

बारामती : राज्याला पुन्हा अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकासन झालं आहे. हातातोंडला आलेली पिकं पुन्हा मातीमोल झाली आहेत. गहू, हरभरा, अशा पिकांना अवकाली पावासाचा जास्त फटका बसला आहे. हे नुकासन लक्षात घेता शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI