Iran-Israel War : संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? अजूनही वेळ गेलेली नाही, ट्रम्पची इराणला धमकी
इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रालयी नागरिक बंकरमध्ये आश्रय घेतलाय. इस्त्रायल-इराण संघर्ष पेटल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय.
इस्त्रायल-इराण संघर्ष चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मिसाईल्सच्या वर्षावात इस्त्रायलने इराणच्या सैन्यप्रमुखासह सहा अणुशास्त्रज्ञांना ठार केलंय. इस्त्रायलच्या हल्ल्यात ६९ इराणी नागरिक मारले गेल्याचं इराण सरकारने म्हटलंय. इराणवरच्या हल्ल्यामध्ये इस्त्रायल गुप्तचर संघटना मोसदचा मोठा वाटा आहे. इराणकडून संभाव्य अणुहल्ल्याचा धोका टाळण्यासाठी ऑपरेशन राबवलं असल्याचे इस्त्रायलने म्हटलंय. इस्त्रायलने याला ऑपरेशन रायझिंग लायन असं नाव दिलंय. इस्त्रायलच्या या हल्ल्यानंतरही इराणनंही प्रतिहल्ला चढवलाय. इस्त्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला इराणनं ऑपरेशन प्रॉमिस राबवत इस्त्रायलला उत्तर दिलंय. इराणने इस्त्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. इस्त्रायलमधील तेल अवीव शहरात इराणच्या क्षेपणास्त्रांकडून विध्वंस घडवण्यात आलाय. तेल अवीव शहरातील अनेक इमारतींनी इराणी क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केलंय. इराणच्या हल्ल्यामुळे संपूर्ण इस्त्रायलमध्ये रेड अलर्ट जारी कऱण्यात आलाय.

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
