Iran-Israel War : इस्रायल-इराण युद्धात भारताचे पाच खास मित्र कोणत्या देशाच्या बाजूने? त्यांची भूमिका काय?
Iran-Israel War : इस्रायल-इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत चालली आहे. ही लढाई अधिक भीषण होत आहे. या युद्धात भारताची भूमिका तटस्थतेची आहे. मात्र भारताचे पाच पक्के मित्र कोणाच्या बाजूने आहेत? ते महत्त्वाच आहे.

इराण-इस्रायल युद्ध अजून भीषण होत चाललय. दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. रात्री उशिरा बॅलेस्टिक मिसाइल्सनी हल्ले केल्यानंतर इराणकडून आता ड्रोन्स डागले जात आहेत. इस्रायल सुद्धा या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. हे युद्ध वेळीच थांबलं नाही, तर भीषण रुप धारण करेल. या युद्धाचे मध्यपूर्वेशिवाय संपूर्ण जगावर परिणाम दिसून येतील. भारताने या तणावाबद्दल आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. आता नजर भारताच्या पाच खास मित्रांवर आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण-इस्रायल युद्धावर भारताची तटस्थ भूमिका मांडली. कारण लढणारे दोन्ही देश भारताचे खात्र मित्र आहेत. त्यांच्यासोबत भारताचे वर्षानुवर्षाचे व्यापारी संबंध आहेत. त्यानंतर भारताच्या भरवशाच्या विश्वासर्ह मित्रांमध्ये रशिया, सौदी अरेबिया, अमेरिका, फ्रान्स आणि कतरच नाव येतं. यात कतर आणि सौदी अरेबिया हे दोन मुस्लिम देश आहेत. रशिया आणि अमेरिका नेहमीच परस्परांच्या विरोधात असतात.
पहिला मित्र कोणासोबत?
इराण-इस्रायल युद्धात अमेरिका थेटपणे इस्रायलच्या बाजूने उभा आहे. ट्रम्प इराणसोबत न्यूक्लियर डीलबद्दल बोलत आहेत, त्यामुळे अमेरिकेने इराण विरोधात कठोर भूमिका घेतलेली नाही. 7 टप्प्याची बोलणी झाली होती. आठव्या टप्प्याची बोलणी 15 जून रोजी ओमानमध्ये प्रस्तावित होती. सध्या ही बैठक अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. अमेरिकेने अजूनही इराणला चर्चेच्या टेबलावर येण्याची संधी दिली आहे.
दुसऱ्या मित्र देशाची भूमिका
इराण-इस्रायल लढाईत सौदी अरेबियाने इराणची बाजू घेतली आहे. पण त्यांनी जाहीरपणे इस्रायलचा विरोध केलेला नाही. संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे. त्यामुळे हे युद्ध पुढे वाढलं, तर सौदी अरेबिया काय भूमिका घेणार? इराणची साथ देणार का? यावर लक्ष असेल. इराण-इस्रायल संघर्षात नेहमीच सौदीची भूमिका तटस्थ राहिली आहे.
भारताचा तिसरा सच्चा मित्र
भारताचा खास मित्र रशिया त्यांना इस्रायल-इराणमध्ये शांतता करार घडवायचा आहे. या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी आहे. त्यामुळे संघर्ष वाढल्यास रशिया इराणच्या बाजूने उभा राहू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण त्यात त्यांना यश मिळत नाहीय.
चौथ्या मित्राची भूमिका काय?
फ्रान्स इराण-इस्रायल तणावासाठी दोन्ही देशांना जबाबदार धरतोय. फ्रान्स इस्रायलच्या बाजूने जाऊ शकतो. फ्रान्स सरकारने इराणला तात्काळ अमेरिकेशी बोलून तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. उद्या संघर्ष वाढल्यास फ्रान्स इस्रायलच्या बाजूने उभा राहू शकतो.
भारताच्या पाचव्या मित्राची भूमिका काय?
मुस्लिम देश कतरने या तणावासाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे. कतर स्वत:ला शांततेच्या बाजूने असल्याच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. उद्या युद्ध वाढल्यास कतर काय भूमिका घेतो? याकडे लक्ष असेल. कतरही भारत आणि सौदी अरेबियाप्रमाणे तटस्थ राहण्याचा पर्याय निवडू शकतो.
