लढणार आणि जिंकणार, उमेदवारी जाहीर होताच वैशाली दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबतच राहणे पसंत केले होते. वैशाली दरेकर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत याबाबत त्यांना विचारलं असतं त्यांनी समोर कितीही तगडं आव्हान असलं तरी लढणार असल्याचं म्हटलं.

लढणार आणि जिंकणार, उमेदवारी जाहीर होताच वैशाली दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
| Updated on: Apr 03, 2024 | 6:54 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे . शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे उमेदवारी जवळपास निश्चित आहे. आज शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खंद्या समर्थक आहेत. वैशाली दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती. मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबतच राहणे पसंत केले होते. वैशाली दरेकर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत याबाबत त्यांना विचारलं असतं त्यांनी समोर कितीही तगडं आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. पुढे त्या असेही म्हणाल्या, साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. मी त्यांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी 100% प्रयत्न करेन. आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. ते शंभर टक्के प्रयत्न करतील या वेळेला कल्याण लोकसभेचा खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच असेल असेही त्यांनी म्हटले.

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.