Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट; पंख्याची फॉरेन्सिक तपासणी, काय आलं समोर?
Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी नवा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून वैष्णवीने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या फॅनची देखील फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता गळफास घेण्यासाठी वापरलेल्या पंख्याची देखील आता फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. वैष्णवीने गळफास घेतला तो पंख किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे. तसंच वैष्णवीचा पती, सासरा आणि दिराला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या तिघांची आज पोलीस कोठडी संपत आहे.
वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरकडून होणाऱ्या हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात समोर आलेल्या अनेक धक्कादायक खुलास्यांनंतर हगवणे कुटुंबाला पोलिसांनी अटक केली. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी देखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या माहितीनंतर आता वैष्णवीने गळफास घेतलेल्या पंख्याची देखील फॉरेन्सिक तपासणी होणार असल्याचं समोर आलं आहे.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...

