Special Report | प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीने मविआची समिकरणं बदलणार?
याच दरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधान आलं आहे. आंबेडकर यांनी पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली
मुंबई : काहीच दिवसांपुर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकत्र येत अनेकांना धक्का दिला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीसाठी मविआची दारं उघडणार अशी चर्चा सुरू होती. याच दरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधान आलं आहे. आंबेडकर यांनी पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. मात्र त्यांच्यात नक्की काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही. मात्र प्रकाश आंबेडकर लवकरच महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा आहे. तर या बैठकीमुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. याच्याआधीच आंबेडकर यांनी नुकतेच राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

