AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा; लॉजिक काय?

कर्नाटकात रिपाइं 15 जागा लढणार आहे. मी रिपाइं उमेदवारांच्या प्रचाराला कर्नाटकात जाणार आहे. काँग्रेस आणि जेडीएस यात संघर्ष होणार नाही हे आम्ही पाहणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा; लॉजिक काय?
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 9:43 AM
Share

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर कधीही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल. पण कोर्टाला कुणालाही अपात्र ठरवता येणार नाही. तसा कोर्टाला अधिकार नाहीये. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयातून कोणी अपात्र होईल असं वाटत नाही, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर यांनी आमदारच अपात्र होणार नसल्याचं स्पष्ट केल्याने राज्यातील सत्तासंघर्षावर पुढे काय होणार? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी आला तर सुप्रीम कोर्टाला कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही. कोर्टाच्या निर्णयातून कोणी अपात्र होईल असं वाटत नाही. राज्यातील बंडाच्यावेळी जे डेप्युटी स्पीकर होते, त्यांच्या निर्णयाला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली होती. तो स्टे उठवला जाईल असं वाटतं. राज्यपाल आणि कार्यमंडळ यातील हा प्रश्न आहे. त्यात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. हा घटनात्मक मुद्दा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्यपालांचा निर्णय फिरवला जाणार नाही

राज्यपालांनी घेतलेला निर्णय हा योग्य की आयोग्य यावर कोर्ट भाष्य करू शकत नाही. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यपालांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले जातील. पण त्यांचा निर्णय फिरवला जाऊ शकेल असं वाटत नाही. कारण ती घटना घडून गेली आहे. राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली. मतदानासाठी सभागृह बोलावण्यात आले होते. पण त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. राज्यपालांनी दिलेल्या आदेशाचा अंमल झाला. ते आदेश कोर्ट मागे घेईल असं वाटत नाही. ते घटनात्मक बंधन आहे असं वाटतं, असं आंबेडकर म्हणाले.

पण मानसिकता हवी होती

यावेळी त्यांनी खारघर येथील दुर्घटनेवरही भाष्य केलं. महाराष्ट्र सरकार असेल किंवा धर्माधिकारी असतील दोघांनीही चमडी बचाव असा कार्यक्रम केला. साधा कार्यकर्ता कार्यक्रम करतो. तेव्हादुपारी कार्यक्रम कार्यक्रम करायचा असेल तर मंडप टाकतो. पाण्याची व्यवस्था करतो. धर्माधिकारी यांचं ट्रस्ट चार जणांचं आहे. कुटुंबाचं ट्रस्ट आहे. त्यांची संपत्ती किती हे त्यांनी जाहीर केलं नाही. पण एवढं निश्चित आहे की, त्या ट्रस्टची एवढी संपत्ती आहे की ते मंडप टाकू शकले असते. पाण्याची सोय नाही हे माहीत नसताना ते पाणी देऊ शकले असते. पण मानसिकता हवी, असं त्यांनी सांगितलं.

13 कोटी गेले कुठे?

अमित शाह यांनी दुपारीच कार्यक्रम घ्या असा आग्रह धरला होता का हे कन्फर्म झालेलं नाही. ज्या ट्रस्टला आणि व्यक्तीला लाखो रुपयाचे डोनेशन दिलं, त्यांच्याच पुरस्काराच्या कार्यक्रमात ते तुम्हाला साधं छतही देऊ शकत नसतील तर तुम्हीच त्याचा विचार करा, असं माझं भक्तांना आवाहन आहे. कार्यक्रमासाठी 13 कोटी रुपये खर्च केले. ही रक्कम गेली कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. 13 कोटी खर्च केला असेल तर मंडप का टाकला नाही याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसने या प्रकरणावर अधिवेशनाची मागणी केली आहे. त्यावर या अधिवेशनातून काय साध्य होणार आहे हे काँग्रेसने सांगावं, असा टोला त्यांनी लगावला.

दोन भूकंप होणार

महाराष्ट्राच्या राजकरणात भूकंप होण्याचे छोटे साईनस दिसायला लागले आहेत. एक भूकंप होता होता थांबला आहे. दोन भूकंप लवकरच होणार आहे. सगळं मांडत बसलो तर चार्म निघून जाईल. कर्नाटकच्या निवडणुका संपता संपता भूकंप होतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...