New Mumbai Rain : वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
New Mumbai Update : मुंबईसह नवी मुंबईमध्ये देखील कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका बसून वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे.
नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. भिंत खचल्याने पार्किंगमधील अनेक वाहने दाबून मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.
मुंबईसह नवी मुंबईमध्ये देखील कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबईच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढलं आहे. वाशीमध्ये देखील सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने सखल भागांमध्ये पाणी सचायला सुरुवात झाली आहे. त्यातच आज वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील भिंत खचल्याने पार्किंगमधील अनेक वाहने त्याखाली दबून मोठं नुकसान झालं आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी एक व्यक्ती बालंबाल बचवली असल्याचा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ आता समोर आला आहे.