आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे अधिकाऱ्याचे आदेश, करनालचा व्हिडीओ व्हायरल

हरियाणातील करनाल येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे करनाल भागातील एका अधिकाऱ्याचा आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश देणारा व्हिडीओ व्हायरल झालाय.

शेतकरी आंदोलनाला 1 वर्ष उलटलंय, मात्र अद्यापही सरकारने शेतकऱ्यांची कृषी कायदे मागे घेण्याची मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, शनिवारी हरियाणातील करनाल येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे करनाल भागातील एका अधिकाऱ्याचा आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश देणारा व्हिडीओ व्हायरल झालाय.| Video of government officer order to beat farmer protester become viral

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI