Aurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

औरंगाबादच्या काही परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वैजापूर येथे बिबट्याने काही नागरिकांवर हल्ला देखील केला आहे. दरम्यान बिबट्या फिरत असतानाचे काही व्हिडीओही समोर आले आहेत.

औरंगाबादच्या वैजापूर भागात बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. काही परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  बिबट्याने मुक्त संचार करत असल्याचे काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.