Video: दसरा मेळाव्याचा वाद आणखी शिगेला पोहोचणार? बीकेसी मैदानाची परवानगी शिवसेनेला नाकारल्याची चर्चा
पर्यायी मैदान म्हणून बीकेसीसाठी देखील दोघांनी अर्ज केलेला होता, मात्र शिवसेनेला ही परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात दसरा मेळाव्यावरून रस्सीखेच सुरु आहे. शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्यासाठी पुनः पक्षांनी महानगर पालिकेकडे अर्ज केला होता, मात्र काही कारणांमुळे शिंदे गट आणि शिवसेना या दोघांनाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचे नाकारल्याची माहिती आहे. यासोबतच पर्यायी मैदान म्हणून बीकेसीसाठी देखील दोघांनी अर्ज केलेला होता, मात्र शिवसेनेला ही परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी बीकेसीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. अद्याप कुणाचाही अर्ज स्वीकारला नसला तरी दसरा मेळावा हा आता प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे.
Published on: Sep 18, 2022 09:09 AM
Latest Videos
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
