AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अक्टिव्ह मोडमध्ये; शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांना पाठवली नोटीस

Special Report : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अक्टिव्ह मोडमध्ये; शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांना पाठवली नोटीस

| Updated on: Jul 09, 2023 | 10:23 AM
Share

तर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारित विषय असल्याने त्यावर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर या प्रकरणात दिरंगाई होत असल्याची टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जात होती.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांचे सरकार पुन्हा आनलं असतं. पण त्यांनी राजीनामा दिल्यानं हे सरकार योग्य आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारित विषय असल्याने त्यावर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर या प्रकरणात दिरंगाई होत असल्याची टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जात होती. याचदरम्यान अजित पवार गटाने सरकारमध्ये प्रवेश केला आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटासह शिंदे गटातील त्या सर्व आमदारांना नोटीस बजावली आहे. तर सर्व आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी देखील दिला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर लवकरच या प्रकरणाबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 09, 2023 10:23 AM