AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : त्या एका फोनमुळे आपण माघार घेतली, विजय शिवतारे यांचा गौप्यस्फोट

Video : त्या एका फोनमुळे आपण माघार घेतली, विजय शिवतारे यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Mar 30, 2024 | 5:17 PM
Share

इतके दिवस पवार साम्राज्याला सुरुंग लावण्याच्या इर्षेने पेटलेल्या एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर आपले बंड मागे घेतले आहे. आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला पर्यायाने एकनाथ शिंदे यांना फार मोठा फटका बसला असता असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.

सासवड : शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर बारामतीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परंतू आपल्याला त्याआधी आमचे नेते खतगावकर यांचा फोन आला. त्यांनी माझी समजूत काढल्याने आपण या निवडणूकीतून माघार घेतल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे. खतगावकर यांनी मला सांगितले की बापू तुमच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील. अशा प्रकारे सर्वत्र अपक्ष उभे राहीले तर 10 ते 20 खासदार पडतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मताधिक्याने पंतप्रधान पदी विराजमान करण्याचे स्वप्न पुर्ण होणार नसल्याचे त्यांनी मला समजावून सांगितल्याचे शिवतारे यांनी सांगितले. त्यामुळे मी आपल्या तीनही नेत्यांशी बोलून आपल्या मतदार संघातील रखडलेल्या योजनांची परिस्थिती सजावून सांगितली. त्यामुळे राज्य सरकारने या योजनांना चालना देण्याचे आश्वासन दिल्याने आपण निवडणूकीतून अखेर माघार घेतल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळणार आहे.

Published on: Mar 30, 2024 05:14 PM