Vijay Wadettiwar Video : ‘देख तूनी बायको…’ गाण्यावर थिरकले महसूल विभागाचे अधिकारी; विजय वडेट्टीवारांचा संताप; म्हणाले…
पुणे शहरामध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी?? असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बानवकुळे यांना थेट सवाल केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच दुसरीकडे पुणे शहरामध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी?? असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बानवकुळे यांना थेट सवाल केला आहे. महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे, याकडे लक्ष आहे का? असा सवाल करणारं ट्वीट करत विजय वडेट्टीवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरल्याचं दिसतंय. ‘जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात! पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली. या पार्टीमध्ये उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी डान्स केला, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एकीकडे सामान्य नागरिकांवर लहानसहान कारणांसाठी कारवाई केली जाते, अनधिकृत बांधकामे तोडली जातात, तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टवर मजा करत आहेत, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी महसूल विभागावर निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली, ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

