सेमीफायनल आम्ही जिंकलो आता फायनल.., चार राज्यातील निकालावरून वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
विधानसभेची निवडणूक ही सेमी फायनलची निवडणूक आहे. चार राज्यातून समोर येणारे जे कल आहेत, त्यावरुन काँग्रेस जिंकत असल्याचे दिसतंय. चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा फळ असल्याची भावना विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : विधानसभा निवडणुकीच्या निकालात चार राज्यात काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र असताना यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही सेमी फायनलची निवडणूक आहे. चार राज्यातून समोर येणारे जे कल आहेत, त्यावरुन काँग्रेस जिंकत असल्याचे दिसतंय. चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा फळ असल्याची भावना विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. ते पुढे असेही म्हणाले, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांनी जी मेहनत घेतली, राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत जनात वाऱ्यावर सोडली होती, त्यामुळे हे सरकार अशी भावना जनतेची होती. काँग्रेसने सर्व जाती धर्मला एकत्र घेतले. द्वेषाचं राजकारण नाहीतर इथे देशाचं राजकारण चालतं. समाज, धर्म यात विष पेरण्याचं काम भाजपने केलं त्याला सडेतोड उत्तर या चार राज्यातील निकालातून भाजपला मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

