100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना (Anil Deshmukh PA) ईडीने (ED) अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहायचं आहे. दरम्यान या सर्वांवर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कितीही ईडीच्या चौकशी झाल्या तरी महाविकास आघाडी पाच वर्ष टिकणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.