विक्रम काकडेंच्या संपत्तीची तुफान चर्चा, चक्क पार्थ पवारांना दिलंय कोट्यावधीचं कर्ज?

विक्रम काकडेंच्या संपत्तीची तुफान चर्चा, चक्क पार्थ पवारांना दिलंय कोट्यावधीचं कर्ज?

| Updated on: Jun 04, 2026 | 10:42 AM

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. पुणे विधान परिषद मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. पुणे विधान परिषद मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विक्रम काकडेंना जागा दिल्यानंतर राष्ट्रवादीत मोठ्या हालाचली घडल्या अन् पक्षातील नाराजीनाट्या चव्हाट्यावर आलं.

राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे हे देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशात एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार विक्रम काकडे यांच्याकडे तब्बल 150 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना 10 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहितीही समोर आली आहे. याशिवाय अनेक बडे नेते आणि व्यावसायिकांना त्यांनी कर्ज दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Published on: Jun 04, 2026 10:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us