AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut | विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Vinayak Raut | विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Jul 12, 2026 | 11:26 AM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विनायक राऊत, त्यांचे पुत्र आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह एकूण सात जणांविरोधात कौटुंबिक छळ आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारदार गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत धक्कादायक आरोप केले आहेत. लग्नानंतर हनिमूनसाठी ऊटीला गेल्यानंतर पती गितेश राऊत यांनी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली. याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी मानसिक जुळवणूक अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

गिरीजा राऊत यांनी पुढे आरोप केला की, २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही पतीने आपल्याशी अंतर ठेवले. शारीरिक संबंधांबाबत झालेल्या वादानंतर शिवीगाळ, मारहाण आणि उपाशी ठेवण्यासारखा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच “तू मला हात लावला तर तू विधवा होशील,” अशी धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय, तक्रारीत जादूटोणा केल्याचे, केस कापल्याचे, गोमूत्र पाजल्याचे आणि विविध प्रकारे मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनायक राऊत, गितेश राऊत आणि इतर सात जणांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या गंभीर आरोपांवर संबंधितांकडून काय भूमिका मांडली जाते आणि तपासात पुढे काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 12, 2026 11:26 AM

Follow Us