Virat Kohli Retirement : कसोटीतील ‘विराट’ पर्व संपलं, कसोटी क्रिकेटमधील पदार्पणासह जाणून घ्या बरंच काही
बुधवारी (७ मे) कर्णधार रोहित शर्मानेही कसोटी सान्यातून निवृत्ती घेतल्याने भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना आता विराट कोहलीच्या निर्णयाने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. एका आठवड्यात दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे चाहते नाराज झाले आहेत.
रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेट सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी विराट कोहलीशी चर्चा करत त्याची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले आणि निवृत्तीचा निर्णय घेण्यापासून त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला. सोमवारी विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या आठवड्यात बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतर विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र आज कसोटीतून रिटायर होण्याच्या निर्णयाची त्याने अधिकृत घोषणा केली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं पण हीच निर्णय घेण्याची योग्य वेळ आहे, असं विराटने सोशल मीडियावर म्हटलंय.
२० जून २०११ साली वेस्ट इंडिजविरूद्ध विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झालं होतं.
सिडनीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ३ जानेवारी २०२५ मध्ये विराटने शेवटचा कसोटी सामना खेळला
विराटने १२३ कसोटी सामन्यांमध्ये भारताने प्रातिनिधित्व केलं.
२१० डावांमध्ये ४६ च्या सरासरीने विराटच्या नावावर ९ हजार २३० धावा
कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर ७ द्विशतकं
कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकं करणारा विराट दुसरा खेळडू