Brazil | ब्राझीलमध्ये पर्यटकांच्या अंगावर कोसळली दरड, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

ब्राझीलमधील एका धबधब्याजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर दगड काळ बनून कोसळला आहे. धबधब्याजवळ दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्राझीलमधील एका धबधब्याजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर दगड काळ बनून कोसळला आहे. धबधब्याजवळ दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ पर्यटक गेले होते. बोटीत बसून पर्यटक तेथील धबधब्याचा आनंद घेत होते. त्याचदरम्यान धबधब्याजवळील एक मोठा दगड खाली कोसळला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 30 हून अधिक पर्यटक यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI