AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad News : वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध

Walmik Karad News : वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध

| Updated on: Jun 08, 2025 | 6:23 PM

Beed Crime News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध दर्शवण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध करण्यात आला आहे. आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी विरोध केला आहे. बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आलं आहे. वाल्मिक कराडकडून न्यायालयात वकिलाच्या मार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने बीड न्यायालयात दोषमुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. मात्र या अर्जाला आवादा पवनचक्की प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. कंपनीच्या शिवाजी थोपटेकडे २ कोटींची मागणी केली होती. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आरोपी सुदर्शन घुले याने शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कराडच्या सहकाऱ्यानी ६ डिसेंबर रोजी पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली. या प्रकरणात वाल्मिक कराडने वकिलामार्फत न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळत मी निर्दोष आहे, असा दावा केला होता. परंतु न्यायालयाने सरकारी वकील, तपासी अधिकारी तसेच आवादा प्रकल्प व्यवस्थापकांचे म्हणणे मागवले आहे. त्यानंतर आवादा पवनचक्की कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी कोर्टात शपथपत्र सादर करून कराडच्या अर्जाला विरोध केला.

Published on: Jun 08, 2025 06:23 PM