‘कराडच्या बातम्या पाहिल्या तर संतोष देशमुख करू..’, धमकी देत कोयत्यानं वार, बीडमध्ये चाललंय काय?
वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतो, अशी धमकी देत बीडमध्ये पुन्हा एकदा तरूणाच्या डोक्यावर कोयत्याने वार झालेत. त्यामुळे बीडमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न अजूनही कायम आहे.
बीड जिल्ह्याची बदनामी सुरु असल्याचा दावा जरी मुंडे बंधुभगिनी करत असले, तरी गुन्हेगारांच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा धारूरमध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ल्याची घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यामधल्या धारूरमध्ये होमगार्ड असलेला अशोक मोहिते राहतो. काल दुपारी तीनच्या दरम्यान कऱ्हाडबद्दलच्या बातम्या मोबाईल मध्ये पाहत होता. तेव्हा तिथे आलेले वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी कऱ्हाड मुंडे साहेबांवरच्या बातम्या का पाहतो म्हणून तरुणाला दमदाटी केली. तुझाही संतोष देशमुख करू अशी धमकी सुद्धा दोघांकडून देण्यात आली. यावरून वाद सुरू झाल्यावर दोघांनी मोहितेच्या डोक्यात कोयता घालून दोघे फरार झाले. होमगार्ड अशोक मोहितेना लातूरच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असून पुढचे 48 तासानंतर प्रकृतीची अधिक माहिती देऊ असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेल्या कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामध्ये आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवला गेलाय. आंधळेच्या वाढदिवसाला दोघांनी स्टेटसही ठेवलं होतं. आंधळेवर जीवघेणा हल्ल्यासहित अनेक गुन्हे दाखल होते. त्याला फरारही घोषित केलं गेलं होतं. पण देशमुख हत्या प्रकरणातही तो फरार झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांचे हात आंधळेपर्यंत पोहोचू शकलेले नाही. कऱ्हाड तुरुंगात असला तरी त्याच्या टोळीच्या जवळचे लोक मात्र लोकांवर जीवघेणा हल्ला करू लागले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

