Washim Farmer Loss | अवकाळीच्या ‘अवकृपे’ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं नुकसान
वाशिम येथे अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा-बारा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त झालं.
वाशिम येथे अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा-बारा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त झालं.
महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यावेळी शेत मालकांनी लाखो रुपये खर्च करुन 729 हेक्टवर पिक लावलं होतं मात्र सलग तीन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिठीमुळे सगळंच्यासगळं पिक उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना यंदा जास्त उत्पादन होण्यार अशी अपेक्षा होती मात्र अवकाळीमुळे काहीच उरलेलं नाही. वाशिम येथील 894 शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून त्यांच्याकडे आता नष्ट झालेलं पिक कापणीचेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांवर अगदी कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे.
दरम्यान, झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Published on: Apr 08, 2026 04:15 PM
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग

