Jayant Patil | सीएमवर चंद्रकांतदादा रोज का बोलतात हे त्यांनाच विचारायला हवं : जयंत पाटील

देशातील वातावरण शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर झालेले घटना यानंतर चित्र बदलत आहे. लोक पर्याय हुडकत आहेत. त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही मंत्री आणि आमदार भाजपमधून दुसऱ्या पक्षात जात आहे. याचाच अर्थ राज्य कोणत्या दिशेनं जात आहे, असे जयंत पाटील म्हणाले. 

सांगली : मुख्यमंत्र्यावर दररोज चंद्रकांत पाटील का बोलतात हे मला आता त्यांनाच विचारायला पाहिजे. मुख्यमंत्री आता कार्यरत झालेत. त्यामुळे चंद्रकात पाटील सतत मुख्यमंत्र्यावर का बोलतात ते मला त्यांनाच विचारायला पाहिजे. अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. ते सांगलीमध्ये पोट निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी बोलत होते. देशातील वातावरण शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर झालेले घटना यानंतर चित्र बदलत आहे. लोक पर्याय हुडकत आहेत. त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही मंत्री आणि आमदार भाजपमधून दुसऱ्या पक्षात जात आहे. याचाच अर्थ राज्य कोणत्या दिशेनं जात आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI