फिरण्यासाठी कोकणात जाताय? जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची…
वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती मिळत असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग अशा साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. मात्र तुम्हीदेखील कोकणात जाण्याचा प्लान करत असताल तर थांबा
सुट्टया लागल्या की पर्यटकांची पाऊलं निसर्गरम्य कोकणाकडे वळतात. वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती मिळत असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग अशा साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. मात्र तुम्हीदेखील कोकणात जाण्याचा प्लान करत असताल तर थांबा तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कोकणातील जलपर्यंटन आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने यासंदर्भातील आदेश दिले आहेत. खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. तसेच समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

