Ajir Pawar : आम्हीही उत्तर प्रदेशमध्ये जाऊन महाराष्ट्राचं कार्यालय काढू शकतो – अजित पवार

नवी मुंबई येथेही इतर राज्याची सदने आहेत. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात.काही वेगळया स्वरूपाचा विचार मनामध्ये ठेवून युपी सरकारने हा निर्णय घेतला असेल त्याच्याविरोध करण्याचे आमचे काही कारण नाही. उद्या आम्हालाही वाटले तर आम्ही उत्तरप्रदेशमध्ये जाऊन महाराष्ट्राचं कार्यालय काढू शकतो

प्राजक्ता ढेकळे

|

May 12, 2022 | 4:31 PM

मुंबई – नेहमीप्रमाणे काल मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. मध्ये एक बातमी आली उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये एक कार्यालय काढणार आहेत. कुणी कुठे कार्यालय काढावे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. हे आपलयाला माहित आहे. जस दिल्लीमध्ये महाराष्ट्रासह(Maharashtra) इतर वेगवेगळ्या राज्याची सदने आहेत. नवी मुंबई येथेही इतर राज्याची सदने आहेत. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात.काही वेगळया स्वरूपाचा विचार मनामध्ये ठेवून युपी सरकारने हा निर्णय घेतला असेल त्याच्याविरोध करण्याचे आमचे काही कारण नाही. उद्या आम्हालाही वाटले तर आम्ही उत्तरप्रदेशमध्ये जाऊन महाराष्ट्राचं कार्यालय काढू शकतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें