'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,' पतीचे कौतूक करताना काय म्हणाल्या अमृता फडणवीस

‘पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने…,’ पतीचे कौतूक करताना काय म्हणाल्या अमृता फडणवीस

| Updated on: Dec 05, 2024 | 5:04 PM

महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी आझाद मैदानातील शामियान्यात समाजातील प्रतिष्ठीत मंडळींसोबत साधू -संत, लाडक्या बहिणी, डब्बेवाले अशा सर्व स्तरातील मंडळी पोहचली..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी,’ मी पुन्हा येईन…’ ही घोषणा अखेर सत्यात आणून दाखविली. त्यांनी पहाटेचा शपथविधी केल्यानंतर ७२ तासांत सरकार गमावल्यानंतर जिद्दीने राजकारण सुरु केले होते. नंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडून त्यांनी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले. लोकसभेतील अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा सर्वाधिक आमदार मिळवत भाजपा महायुतीला सत्तेचा मार्ग दाखवला. आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. याबद्दल त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पतीचे कौतूक करता देवेंद्रजी सहाव्यांदा आमदार झाले आहेत. तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. आता उलट जबाबदारी वाढलेली आहे. देवेंद्रजी यांच्याकडे पेशन्स, जिद्दी आणि चिकाटी भरपूर आहे. जी गोष्ट ठरवतात ती करून दाखवाताच अशा शब्दात अमृता यांनी आपल्या पतीचे कौतूक केले आहे.

 

Published on: Dec 05, 2024 05:02 PM