Nagpur | भाजपचा प्रचार करणाऱ्या आशिष देशमुखांवर कारवाई काय? चंद्रकांत हांडोरे म्हणतात…

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अच्छे दिन आणणाऱ्या नागपूर जिल्हा काँग्रेसमधील वाद थांबत नसल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत मिळाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चंद्रकांत हांडोरे समिती नागपुरात दाखल झालीय. तर, आशिष देशमुख हायकमांडला भेटायला दिल्लीत गेले असल्याची माहिती आहे. आज काँग्रेसच्या स्थानिक वरीष्ठ नेत्यांशी संवाद साधणार असून, लवकरच अहवाल पक्षाध्यक्षांकडे सादर करणार, अशी माहिती चंद्रकांत हांडोरे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचारार्थ बैठक घेतल्याची माहिती आहे. 25 सप्टेंबर रोजी 2021 सावरगाव जि. प. च्या भाजपा उमेदवार पार्वतीताई काळबांडे यांचे प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांचे निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी आमदार आशिष देशमुख यांनी बैठक घेतली होती. यावेळी भाजपचे उकेश चव्हाण यांचेसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI