Rohit Arya Encounter : पवईत रोहित आर्याचा एन्काऊंटर करणारे एपीआय अमोल वाघमारे कोण?
पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या ऑपरेशनमध्ये अमोल वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कमांडो प्रशिक्षणामुळे त्यांना आत प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. त्यांनीच बाथरूमची काच फोडून आत प्रवेश करत रोहित आर्यावर गोळी झाडली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पवई येथील स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना आणि 2 नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. रोहित आर्याकडे एअरगन असल्याने तो गोळीबार करेल अशी पोलिसांना भीती होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहित आर्याला कंठस्नान घातले.
या धाडसी ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे एपीआय अमोल वाघमारे हे गेल्याच महिन्यात पवई पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. अमोल वाघमारे हे तात्काळ मदतीला धावून येणाऱ्या क्यूआरटी (Quick Response Team) कमांडो टीममधील अधिकारी आहेत. कमांडो प्रशिक्षण घेतल्यामुळेच त्यांना या मोहिमेत आत प्रवेश करण्याची विशेष परवानगी मिळाली. अग्निशमन दलाच्या उंच शिडीचा वापर करून आणि बाथरूमची काच फोडून वाघमारे स्टुडिओच्या आत शिरले. त्यांनीच रोहित आर्यावर गोळी झाडली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या शौर्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि ओलीस असलेल्या मुलांचा जीव वाचला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

