Shivasen : शिवसेना राज्यसभेची उमेदवारी कुणाला? सायंकाळी होणार स्पष्ट ,चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे शिवसेना उमेदवाराची घोषणा करतील. महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला राज्यसभेची उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

May 23, 2022 | 5:30 PM

मुंबई – राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकीय पातळीवर जोरदार घमासान सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रवेशाची ऑफर नाकारल्यात जमा आहे. कारण, उद्धव ठाकरे यांनी ‘शिवबंधन’ बांधण्यासाठी संभाजीराजे यांना आज ‘वर्षा’वर येण्यासाठी निरोप दिला होता. मात्र, दुपार उलटून गेल्यानंतरही संभाजीराजे वर्षाकडे फिरकले नाहीत. अशावेळी आज संध्याकाळी शिवसेना (Shivsena) आपल्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिवसेना उमेदवाराची घोषणा करतील. महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील (Rural Area) शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला राज्यसभेची उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें