देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल ?
राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेत अनेक अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी होत्या असा सनसनाटी आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत अर्बन नक्षलवादी संघटना सामील होत्या असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एटीएसने ४० नक्षलवादी संघटनांची यादी दिलेली होती. या ‘भारत जोडो’ यात्रेत १३ संघटना सामील होत्या असेही देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सांगितले होते. यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे. हातात सत्ता असल्याने देवेंद्र फडणवीस काही बोलतात. त्यांच्या अवतीभवती कोण माणसे आहेत. याची त्यांनी एकदा माहिती करावी. भारत जोडो यात्रेत अनेक निवृत्त लष्करी अधिकारी होते. कलाकार, अभिनेते सामील झाले होते. मी स्वत: राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत पठाणकोट ते जम्मू २८ किलोमीटर या यात्रेत चाललो आहे. मी काय अर्बन नक्षलवादी आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

