ट्रिपल इंजिन सरकारचा भावी पायलट कोण? भावी मुख्यमंत्रीपदावरून उडाला एकच धुराळा, बघा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच 2024 ला ही मुख्यमंत्री व्हावेत, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, असं विधान संजय शिरसाट यांनी केले. ज्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुन नाराजीचा धूर निघू लागल्याची चर्चा
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | ट्रिपल इंजिन सरकारचा भावी पायलट कोण असेल, यावरुन दावे सुरु आहेत. त्याच दाव्यांनी आज जरा गंभीर रुप घेतलं. 2024 ला ही शिंदेंच मुख्यमंत्री व्हावेत, आणि फडणवीसांनी दिल्लीत जावं, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं. ज्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुन नाराजीचा धूर निघू लागल्याची चर्चा आहे. ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुन धुराळा सुरु आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री व्हावं वाटण्यात गैर नाही., मात्र यावेळी शिंदे गटाच्या शिरसाटांनी फडणवीसांनी थेट दिल्लीत जावं, असं विधान केलंय. मुख्यमंत्रीपदावर सत्तेतले तिन्ही पक्ष दावे करतायत. मात्र शिरसाट आणि भुजबळांच्या विधानानंतर नेत्यांनी मर्यादा न ओलांडण्याचा सल्ला भाजपच्या विखे-पाटलांनी दिलाय. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय म्हणाले विखे-पाटील…
Published on: Oct 08, 2023 09:15 AM
भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून...
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
