Eknath Shinde : मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी झाली, हे पाप कुणाचे? मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणावर?
मुंबईबद्दल एवढे प्रेम आहे तर रोखठोकमध्ये मुंबईत मराठी माणूस किती उरला आहे याची आकडेवारी जाहीर करावी असे अव्हान केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणसाच्या नावाखाली केवळ मते मागण्याचे काम झाले आहे. मुंबईमधला मराठी माणूस का शहर सोडून इतरत्र जात आहे, याचे उत्तर द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुंबई : (Samana) सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गटावर टीका करण्यात आली होती. याला देखील (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. शिंदे गटावर टीका करण्याचे डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ थांबत नाही. तर रोखठोकमध्ये (Mumbai) मुंबई आपली असल्याचे सांगत मुंबई गिळायला शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात असल्याच्या आरोपालाही शिंदेंनी उत्तर दिले आहे. हे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. मुंबईबद्दल एवढे प्रेम आहे तर रोखठोकमध्ये मुंबईत मराठी माणूस किती उरला आहे याची आकडेवारी जाहीर करावी असे अव्हान केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणसाच्या नावाखाली केवळ मते मागण्याचे काम झाले आहे. मुंबईमधला मराठी माणूस का शहर सोडून इतरत्र जात आहे, याचे उत्तर द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द

