Video : महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हवीच कशाला? आनंद दवे यांचा सवाल

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान, दवे यांच्या या विधानावर एमआयएमकडून अजून प्रतिक्रिया आली नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 13, 2022 | 11:29 AM

पुणे: एमआयएमचे (mim) नेते अकबरुद्दी ओवैसी (Akbaruddin Owaisi)  यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावर आता टीका होऊ लागली आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (anand dave)यांनी थेट औरंगजेबाच्या कबरीलाच आक्षेप घेतला आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे. आमच्या शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, संभाजी राजांना ठार मारणाऱ्या, छत्रपतींच्या पूर्ण परिवारालाच शत्रू समजणाऱ्या, आमच्या दैवतांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या राज्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची कबर इथे हवीच कशासाठी? असा सवाल दवे यांनी केला आहे. दवे यांनी हा सवाल केल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान, दवे यांच्या या विधानावर एमआयएमकडून अजून प्रतिक्रिया आली नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें