Anil Deshmukh | पदावरुन हटवल्यानंतर परमबीर सिंह यांचे माझ्यावर आरोप का? अनिल देशमुखांचा सवाल

| Updated on: Jul 08, 2021 | 12:33 PM

"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले", असं अनिल देशमुख म्हणाले Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh first reaction ED raid on his house).

Anil Deshmukh | पदावरुन हटवल्यानंतर परमबीर सिंह यांचे माझ्यावर आरोप का? अनिल देशमुखांचा सवाल
Parambir Singh
Follow us on

मुंबई :  “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांच्या संशयास्पद भूमिकेवरुन त्यांना आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तेव्हा ते आयुक्त असताना त्यांनी माझ्यावर आरोप करायला हवे होते”,  अशी भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली. देशमुख यांनी आज अखेर संध्याकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देऊन आपली बाजू मांडली. (Why Parambir Singh’s allegations against me after being removed from office? Anil Deshmukh raised question)

अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

“ईडीचे काही अधिकारी चौकशीसाठी आले होते. त्यांना सहकार्य केलं आणि पुढील काळातही करु. परमबीर सिंग जे पोलीस आयुक्त होते. त्यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते. पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तर त्यांनी पदावर असताना करायचे होते. परमबीर सिंग आयुक्त होते तेव्हा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडलेलं प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण झालं त्यातील आरोपी एपीआय सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे सुनील माने  हे मुंबई पोलीस आयुक्तालयात काम करत होते. ते आयुक्तांना रिपोर्टिंग करत होते”, असं अनिल देशमुख म्हणाले.

“उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडले, तसेच मनसूख हिरेन प्रकरण यामध्ये सापडलेले पोलीस अधिकारी हे मुबंई पोलीस आयुक्तालयात कामाला होते. ते सर्व परमबीर सिंगाना रिपोर्ट करायचे. या प्रकरणातील आरोपी ठरलेले पाचही अधिकारी परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. पण त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. माझ्याकडून ईडी आणि सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेन”, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली.

अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून काय-काय घडलं?

ईडी अधिकारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सीआरपीएफ जवानांच्या एका पथकासह अनिल देशमुख यांच्या मुंबईतील खासगी निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीत पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत जवळपास 10 सीआरपीएफ जवान होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमही होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दोन गाड्या सुखदा इमारतीच्या परिसरात आल्या. यापैकी पुढच्या गाडीत स्वत: अनिल देशमुख होते. ईडी अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांचे आणि निकटवर्तीयांचे मोबाईल आणि डिजीटल डेटा ताब्यात घेतला. त्यानंतर फॉरेन्सिक टीम दुपारी अडीच्या सुमारास सुखदा इमारतीतून बाहेर पडताना दिसली.

संबंधित बातम्या : 

अनिल देशमुखांना धक्क्यावर धक्के, ईडीचे सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापे

(Why Parambir Singh’s allegations against me after being removed from office? Anil Deshmukh raised question)