Special Report | नितीश कुमार भाजपला सोडणार? बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

याआधी नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादवांच्या आरजेडीशी सत्ता स्थापन केली होती. पण ऐन निवडणुकीच्या आधी नितीश कुमारांनी आरजेडीला धक्का दिला होता. आणि पुन्हा भाजपसोबत निवडणुका लढवल्या. याआघाडीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री केलं. मात्र हळूहळू जेडीयूलाच संपवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप सुरु झालाय. त्यामुळं भाजपलाच दूर करण्याचा मूड नितीश कुमारांचा दिसतोय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वनिता कांबळे

Aug 08, 2022 | 11:27 PM

नवी दिल्ली :  महाराष्ट्रात भाजपनं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला जसा झटका दिला. तसा झटका बिहारमध्ये भाजपलाच बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमारच(Nitish Kumar), आता भाजपसोबत राजकीय फारकद घेण्याची शक्यता आहे.  तसं झालं तर भाजप-जेडीयूचं सरकार कोसळणार. मात्र नितीश कुमारांची जेडीयू नव्या सरकारमध्ये राहणार.

सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार पुढच्या 2 दिवसांत भाजपसोबत आघाडी तोडण्याची घोषणा करु शकतात. लालू प्रसादांची आरजेडी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली नितीश कुमारांनी सुरु केल्यात. जेडीयूचा भाजपवर पार्टीत फूट पाडण्याचा आरोप आहे, त्यासाठी भाजपनं आरसीपी सिंह यांचा वापर केल्याचं जेडीयूचं म्हणण आहे. आरपीसी सिंह हे केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यावर नितीश कुमारांनी त्यांना पुन्हा तिकीट दिलं नाही. त्यामुळं आरपीसी सिंहांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
आरपीसी सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचेही आरोप झाले. त्यानंतर नितीश कुमारांनीच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळं आरपीसी सिंह आणि नितीश कुमारांचे संबंध बिघडले आणि त्यांनी जेडीयूतूनही राजीनामा दिला त्यातच आरपीसी सिंह यांच्या संपर्कात जेडीयूचे आमदार असल्याचं बोललं जातंय. पुढच्या घडामोडी घडण्याआधीच स्वत: नितीश कुमारच भाजपशी संबंध तोडू शकतात.

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय, नितीश कुमारांनी सोनिया गांधींशीही फोनवरुन चर्चा केल्याचं बोललं जातंय. भाजप सोडून सर्वच पक्षांनी आपआपल्या आमदारांची बैठक बोलावलीय. म्हणजेच आता भाजप पक्ष फोडत असल्याचा आरोप करुन, नितीश कुमार पुन्हा एकदा लालूंच्या आरजेडीसोबत हातमिळवणी करुन नव्यानं सत्ता स्थापन करु शकतात.

याआधी नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादवांच्या आरजेडीशी सत्ता स्थापन केली होती. पण ऐन निवडणुकीच्या आधी नितीश कुमारांनी आरजेडीला धक्का दिला होता. आणि पुन्हा भाजपसोबत निवडणुका लढवल्या. याआघाडीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री केलं. मात्र हळूहळू जेडीयूलाच संपवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप सुरु झालाय. त्यामुळं भाजपलाच दूर करण्याचा मूड नितीश कुमारांचा दिसतोय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें